Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलावरचा हल्ला निंदनीय – पंतप्रधान


छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेला हल्ला भ्याड आणि निंदनीय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सीआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या शौर्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली असून जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही असे म्हटले आहे.

सीआरपीएफ जवानांवरचा छत्तीसगडमधला हल्ला भ्याड आणि निंदनीय आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

सीआरपीएफ जवानांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ ठरु देणार नाही असे सांगून या जवानांच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

छत्तीसगडमध्ये आज झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.

B.Gokhale/N.Chitale/Anagha