पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांची भेट घेतली. या महिन्याच्या सुरुवातीला ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवलेल्या जपानी नागरिकांसाठी त्यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी दहशतवादविरोधी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
नाकातानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय संरक्षण सहकार्याविषयी घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती सांगितली. पंतप्रधानांनी विशाखापट्टणम येथे फेब्रुवारी 2016 मध्ये संम्मिलीत झालेल्या आंतरराष्ट्रीय विमान पाहणीतील सहभाग आणि जून 2016 मध्ये जपानी समुद्रतटावर घेण्यात आलेले मलबार प्रात्यक्षिकबद्दल स्वागत केले. पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियाच्या विभागीय विकासाबद्दलही पंतप्रधानांना नाकातानी यांनी सविस्तर माहिती सांगितली.
पंतप्रधान मोदी यांनी येत्या वर्षात भरवण्यात येणाऱ्या वार्षिक परिषदेमध्ये आपण उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
B.Gokhale
Mr. Gen Nakatani, Defence Minister of Japan calls on PM @narendramodi. https://t.co/aY0s8JzhQN
— PMO India (@PMOIndia) July 14, 2016
via NMApp