Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026

भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीत पंतप्रधानांनी, जुलै 2026 मध्ये 16 व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेनिमित्त अलीकडेच भारतभेटीवर आलेल्या जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेला उजाळा दिला आणि भारत व जपान यांच्यात संरक्षण सहयोगाला सातत्याने मिळत असलेल्या गतीबद्दल कौतुक केले.

भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला अधिक दृढ करण्यासाठीचा आपला दृष्टिकोन यावेळी पंतप्रधानांनी मांडला आणि हिंद-प्रशांत तसेच त्यापलीकडे क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी भारत-जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी  संरक्षण क्षेत्रात विशेषतः मेक इन इंडियाअंतर्गत सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी भारतीय कंपन्या आणि स्टार्ट-अप्ससोबत भागीदारी करण्याच्या जपानसमोरील संधींवर भर दिला.

जपानचे संरक्षण मंत्री कोइजुमी यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील प्रगतीबाबत पंतप्रधानांना माहिती दिली आणि भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत जपान सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai