पीएम्इंडिया
जम्मू-काश्मीरमधल्या 240 हून अधकि युवकांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. “वतन को जानो” या कार्यक्रमाचा एक हिस्सा म्हणून हे युवक दिल्ली भेटीवर आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन केले आहे. 15 ते 24 वयोगटातील या युवकांपैकी बहुतेक युवक दहशतवादबाधित कुटुंब, अनाथाश्रम आणि समाजाच्या दुर्बल घटकातील आहेत. 7 रेसकोर्सवरील पंचवटी हिरवळीवर पंतप्रधानांशी सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ संवाद साधला. युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भारताच्या विशेषत: जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी असणा-या आपल्या उद्दिष्टांबद्दल पंतप्रधानांनी विस्तृत माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाची अपार क्षमता असून यामुळे लोकांच्या जीवनात समृध्दी येईल असे ते म्हणाले. संपूर्ण राज्यात भौतिक आणि डिजिटल संपर्क निश्चित करण्यााठी केंद्र सराकर काम करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
देशाच्या समग्र विकासाबाबतचे आपले उद्दिष्टही पंतप्रधानांनी विस्तृतपणे सांगितले. या उद्दिष्टांमध्ये 2022 पर्यंत प्रत्येकासाठी घराचे उद्दिष्टही समाविष्ट आहे.
पंतप्रधानांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांचे व्यक्तव्य यांना या युवकांनी उत्साहाने उत्तरे दिली. दिल्ली प्रमाणेच जमू-काश्यमीरचा विकास व्हावा आणि अत्याधुनिक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी इच्छा या युवकांनी व्यक्त केली.
या सुसंवादानंतर पंतप्रधानांनी या युवकांना पंचवटी हिरवळीवर निमंत्रित केले.
Spent an enjoyable evening with over 240 youngsters from J&K. They belong to militancy affected families, orphanages & weaker sections.
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2016
The youngsters from J&K, who are in Delhi as a part of "Wattan Ko Jano" initiative amazed me with their curiosity. They asked me many Qs.
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2016
My young friends are very passionate about J&K's progress & want good infrastructure in the state. pic.twitter.com/8oHrO0b5I5
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2016
Spoke about steps for J&K's development, including in areas like tourism, digital connectivity, housing for all. https://t.co/XTqH3cHR6w
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2016