Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा


जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या सर्वांचे आरोग्य निरोगी राहो तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी आपण इतरांना प्रोत्साहन द्यावे अशा शुभेच्छा मी देतो, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

‘अन्न सुरक्षा’ ही यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे, निरोगी आरोग्य जगण्यासाठी अन्न सुरक्षा अत्यंत महत्वाची असून आपण सर्वांनी त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतातील प्रत्येक नागरिकाला योग्य व किफायतशीर आरोग्यसेवा देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करत असल्याचेही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.