Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ” उत्तम आरोग्य मानवी प्रगतीचा पाया आहे. आजच्या जागतिक आरोग्य दिनी, तुम्हा सर्वाना उत्तम आरोग्य लाभो आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करा अशा मी शुभेच्छा देतो.

जागतिक आरोग्य संघटनेने निवडलेल्या ‘सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती:प्रत्येकजण, प्रत्येक ठिकाणी’ या संकल्पनेचे मी स्वागत करतो. सर्वाना उत्तम आरोग्य लाभावे या ध्यासाने आम्हाला आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्यसेवा कार्यक्रम सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.”

NS/SK
****