Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागरण मंचासमोर पंतप्रधानांचे वक्तव्य

जागरण मंचासमोर पंतप्रधानांचे वक्तव्य

जागरण मंचासमोर पंतप्रधानांचे वक्तव्य


नवी दिल्लीत जागरण प्रकाशनने आयोजित केलेल्या जागरण मंचाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

लोकशाहीमध्ये जागरुकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधानांनी “सार्वकालिन दक्षता ही स्वातंत्र्याची किंमत आहे” यावर जोर दिला. चैतन्यपूर्ण लोकशाहीसाठी जनभागीदारी अर्थात लोकसहभाग हवा. महात्मा गांधीनी, स्वातंत्र्याच्या लढयाचे लोकचळवळीत रुपांतर कसे केले याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. जनआंदोलनाचा हा आदर्श देशाच्या विकासातही राबवायला हवा असे ते म्हणाले.

जनतेवर विश्वास ठेवता कामा नये या धारणेवर स्वातंत्र्यपूर्व काळातले कायदे आधारले होते मात्र आता हा दृष्टीकोन बदलायला हवा असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी कागदपत्रांसाठी स्व-साक्षांकन, स्वच्छ भारत अभियानात जनतेचा सहभाग, स्वयंपाकाच्या गॅससाठीचे अनुदान सोडून देणे याची उदाहरणे दिली.

प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया – स्टॅन्ड अप इंडिया यासारखे उपक्रम सकारात्मक परिणाम कसे निर्माण करत आहे यावषियी त्यांनी माहिती दिली.

मिनिमम गर्व्हमेंट मॅक्सीमम गव्हर्नन्स अर्थात किमान सरकार कमाल प्रशासन हा दृष्टीकोन त्यांनी विषद केला. कालबाहय ठरलेले कायदे नष्ट करायला हवेत असेही पंतप्रधान म्हणाले.

N.Chitale/S.Tupe/M.Desai