पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जालंधर कन्टोन्मेंटच्या सर्व्हे क्र.408 येथे केंद्रीय विद्यालय क्र. 4 च्या बांधकामासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेला संरक्षण विभागाची ए-1 ची 7.5 एकर जमीन वार्षिक 1 रुपया एवढ्या नाममात्र दराने भाडेतत्वावर हस्तांतरित करायला मंजुरी दिली.
पार्श्वभूमी
सध्या जालंधर कन्टोन्मेंट येथील केंद्रीय विद्यालय क्र. 4, सर्व्हे क्र.408 येथे संरक्षण विभागाच्या 26 एकर भूखंडावरील एका तात्पुरत्या इमारतीत कार्यरत आहे. होती. सध्या 1346 मुले या शाळेत शिकत आहेत. केंद्रीय विद्यालयाची कायमस्वरूपी इमारत उभी राहिल्यास जालंधर कॅंटोन्मेंट आणि आसपासच्या परिसरातील मुलांना आवश्यक सुविधांसह योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध होईल.शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर उर्वरित 18.5 एकर जमीन लष्कराकडे हस्तांतरित केली जाईल.
N.Sapre/S.Kane/P.Kor