Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जीएसएलव्ही – MKIII D1/GSAT-19 मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन


जीएसएलव्ही – MKIII D1/GSAT-19 या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.

“जीएसएलव्ही – MKIII D1/GSAT-19 या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या सर्व समर्पित वैज्ञानिकांचे अभिनंदन.

पुढच्या पिढीतील प्रक्षेपक वाहने आणि उपग्रह क्षमता प्राप्त करण्याच्या दृष्टीने या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आगेकूच सुरु ठेवली आहे. देशाला याचा अभिमान वाटतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha