Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जी सॅट-11 च्या प्रक्षेपण सेवा खरेदीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज जी सॅट-11 च्या प्रक्षेपणासाठी सेवा खरेदीच्या 1117 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली.

2016 च्या अखेरीस जी सॅट-11 चे प्रक्षेपण केले जाणार आहे. 5600 किलो लिफ्ट ऑफ वस्तूमान असलेल्या जी-सॅटचे प्रक्षेपण वाहन खरेदी करुन प्रक्षेपण केले जाणार आहे. ग्रामीण दळणवळणाच्या गरजा यामुळे पूर्ण होतील. व्ही सॅट, ब्रॉडबॅण्ड, यासारख्या सेवा या उपग्रहाच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत. ग्राऊंड सेगमेंटमुळे याची क्षमता 10 जीबीपीएस होणार आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील जोडणी (कनेक्टीविटी) मजबूत होण्यास मदत होईल.

जी सॅट हा दळणवळण उपग्रह आहे.

S. Thakur / S.Tupe / M. Desai