पीएम्इंडिया
जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुर्कस्थानचे राष्ट्रपती रिसप तैय्यिप एरडोगन यांची भेट घेतली. उभय नेत्यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांसह आर्थिक सहकार्याबाबत चर्चा केली. चार निर्यात नियंत्रण पध्दतींच्या सदस्यत्वासाठी पंतप्रधानांनी तुर्कस्थानचे सहकार्य मागितले. संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा, नागरी अणु सहकार्य आणि अंतराळ आणि कृषी संशोधनात सहकार्य याबाबतही त्यांनी चर्चा केली.
पंतप्रधानांनी स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राजोय यांचीही भेट घेतली. दहशतवादाविरुध्दच्या लढ्यात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली. रेल्वेचे आधुनिकीकरण, संरक्षण निर्मिती, पुनर्नवीकरणीय ऊर्जा आणि सागरी सुरक्षा आदी मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांचीही भेट घेतली.
S. Kane/S.Tupe/N.Sapre
Turkish connect...a bilateral meeting with the host of @G20Turkey2015, President @RT_Erdogan. pic.twitter.com/smfvO6oyQd
— PMO India (@PMOIndia) November 16, 2015
Prime Minister Mariano Rajoyof Spain and PM @narendramodi hold talks on the sidelinesof @G20Turkey2015. pic.twitter.com/EUg50OwWs5
— PMO India (@PMOIndia) November 16, 2015