पीएम्इंडिया
कंपनी व्यवहार मंत्रालय, भारतीय स्पर्धा आयोग आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स यांच्या, परदेश आणि परदेशातील संघटनांबरोबरच्या सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 जानेवारी 2016 रोजी कार्योत्तर मंजुरी दिली.
यात पुढील सामंजस्य करारांचा समावेश आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालय आणि नेदरलँडचे आर्थिक व्यवहार मंत्रालय
भारतीय स्पर्धा आयोग आणि फेडरल अँटी मोनोपोली सर्व्हिस ऑफ द रशियन फेडरेशन
भारतीय स्पर्धा आयोग आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धा ग्राहक आयोग
भारतीय स्पर्धा आयोग आणि युरोपीय स्पर्धा आयोगाचे महासंचालनालयाचे महासंचालक
भारतीय स्पर्धा आयोग आणि कॅनडा कॉम्पीटीशन ब्युरो
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ, अमेरिका
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि इन्स्टिटयूट ऑफ डायरेक्टर्स, लंडन, यु.के.
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि आंतररराष्ट्रीय वित्त महामंडळ
या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे संबंधित संघटनांमध्ये ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान, तांत्रिक सहकार्य, अनुभवांची देवाणघेवाण आणि सक्तीचे सहकार्य आदी बाबी साध्य होणार आहेत.
M.Pange/S.Tupe/M.Desai