Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2026

 

झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे;

“झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील दुर्दैवी अपघाताचे वृत्त अतिशय दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येकाच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. तसेच जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai