Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे हार्दिक अभिनंदन केले.

या स्पर्धेत 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदकांच्या ऐतिहासिक सर्वोत्तम कामगिरीसह आपल्या खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, दृढनिश्चय आणि समर्पणामुळे उत्कृष्ट यश मिळू शकते.

पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे त्यांच्या अथक प्रयत्न आणि वचनबद्धतेबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढविणा-या या क्रीडापटूंच्या कामगिरीबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये लिहिले:

“टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे हार्दिक अभिनंदन. 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदकांच्या ऐतिहासिक सर्वोत्तम कामगिरीसह आपल्या खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की दृढनिश्चय आणि समर्पणामुळे उत्कृष्ट यश मिळू शकते. प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. संपूर्ण देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो !”

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai