Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाण्यांचे प्रकाशन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाण्यांचे प्रकाशन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाण्यांचे प्रकाशन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाण्यांचे प्रकाशन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाण्यांचे प्रकाशन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण


देशाच्या काना-कोपऱ्यांतून आलेले सर्व वरिष्ठ महनीय व्यक्ती आज 6 डिसेंबर, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण, मला नाही वाटत, कधी कुणी विचार केला असेल की भारताचे नाणे ज्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असेल, असाही दिवस या देशात कधी येऊ शकतो.

साधारणपणे, सार्वजनिक जीवनात बहुतेक लोक मृत्यूपूर्वीच विस्मरणात जातात, तर काही जण मृत्यूबरोबर विस्मरणात जातात. मात्र असे खूप कमी लोक असतात, जे मृत्यूनंतर साठ वर्षांनंतरही जिवंत असतात आणि बाबासाहेब आंबेडकर ती व्यक्ती आहेत. बहुधा त्यांच्या स्वत:च्या कार्यकाळात अनेकांचे त्यांच्याकडे लक्ष गेले नसेल. एक विद्यार्थी म्हणून पाहिले गेले असेल, एक अर्थतज्ञ म्हणून पाहिले गेले असेल, मात्र जसे अरुणजी म्हणाले, भारताच्या आजच्या समस्यासंदर्भात जेव्हा बाबासाहेबांकडे पाहतो, तेव्हा वाटते की एखादी व्यक्ती किती द्रष्टी असू शकते, किती सखोल विचार करते आणि किती सर्वसमावेशक कल्पना करु शकते. म्हणूनच साधारणपणे आपल्या देशात असे होते की, सामान्यांसाठी एखाद्या व्यक्तीची एखाद्या गोष्टीवरुन ओळख तयार होते. बहुआयामी गुणवत्ता सर्वांसमोर खूप क्वचित येते, आणि ज्याचे कारण हे नाही की प्रतिभा कमी पडते, आपल्यात त्रुटी आहेत, सर्व बहुआयामी गोष्टी आपण पाहू शकत नाही, समजू शकत नाही. ते समजण्यासाठी कधी-कधी 60 वर्षे लागतात. आता तर सामाजिक चिंतनासंदर्भातील बाबासाहेबांचे विचार, विशेषत: सामाजिक न्यायाच्या बाबी खालच्या स्तरापर्यंत झिरपल्या आहेत आणि सगळयांना तसे वाटतेही, मात्र बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांसंदर्भात तितक्या सखोलपणे चर्चा झालेली नाही.

या 125 वर्षांच्या प्रसंगी, नव्या पिढीला बाबासाहेबांच्या विचारांची कशा प्रकारे ओळख करुन देता येईल ? संसदेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा झाली, चांगली चर्चा झाली. सर्व माननीय सदस्यांनी आपल्या आपल्या पध्दतीने वर्तमान स्थितीचा आढावा घेतला आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनाशी जोडण्याचा प्रयत्न देखील केला. काही लोकांच्या मनात प्रश्न देखील निर्माण झाला की, मोदीजी आम्ही हे तर समजू शकतो की 15 ऑगस्ट काय आहे, आम्ही हे देखील समजू शकतो की 26 जानेवारी काय आहे, मात्र तुम्ही 26 नोव्हेंबर कुठून उचलून आणलीत ? मला सभागृहात प्रश्न विचारले गेले मला नाही वाटत, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर समजले आहेत, त्यांनी असे प्रश्न विचारले असते.

जेव्हा आपण 26 जानेवारीबदृदल बोलतो, तेव्हा देखील बाबासाहेब आंबेडकर चटकन देशाच्या नजरेसमोर येत नाहीत, हे मानावे लागेल. 15 ऑगस्ट म्हटले की महात्मा गांधी, भगत सिंग सर्व नजरेसमोर येतात, मात्र 26 जानेवारी म्हटले की येत नाहीत आणि इतके मोठे योगदान आपण नाकारु शकत नाही आणि येणाऱ्या पिढीवर संस्कार करण्यासाठी देखील आणि देशाच्या एकतेसाठी देखील अशा महापुरुषांचे योगदान, त्याचे स्मरण आपल्यासाठी एक शक्ती बनते जी समाजाला जोडण्याची संधी आपल्याला देते. आणि त्या अर्थाने संसदेमध्ये आणि माझा विचार आहे कि देशभरात बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयांवर सातत्याने चर्चा व्हायला हवी, आपल्या नव्या स्पर्धा व्हायला हव्यात, वक्तृत्व स्पर्धा व्हायला हव्यात, हे निरंतर चालू राहायला हवे. मी सरकारला याबाबत आराखडा तयार करायला सांगितले आहे. आगामी काळात 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत हे करायला हवे. 26 जानेवारी रोजी सर्व पारितोषिके जाहीर करावीत. अशी एक व्यवस्था उभारायला हवी, जेणेकरुन नवीन पिढीला माहिती मिळेल.

बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे वैविध्य, वैशिष्टय पहा, मी वेगळया दृष्टिकोनातून पाहतो. समाजाकडून ते पीडित होते, समाजाबाबत ते दु:खी होते आणि समाजाच्या प्रति त्यांच्या मनात आक्रोश देखील होता आणि या परिस्थितीत बदल घडवून आणण्याची एक दुर्दम्य इच्छा देखील होती. मात्र अशा परिस्थितीत देखील जेव्हा त्यांनी जग पाहिले आणि त्यांनी लिहिले आहे की, जेव्हा भारताबाहेर पाच वर्ष राहिलो, तेव्हा अस्पृश्यता म्हणजे काय हे मी विसरुन गेलो होतो. मला आठवतच नव्हते, कारण, इथे एका बाजूला अशा प्रकारची अपमानित अवसथा आणि दुसरीकडे आदराची वागणूक मिळत असेल, मात्र तरीही एखाद्या माणसाची इच्छाशक्ती कशी असेल, ती आदराची परिस्थिती सोडून भले अपमानास्पद आयुष्य जगावे लागेल, पण परत जाईन आणि परत येतात, ही छोटी गोष्ट नाही. एका व्यक्तिमत्वाचे, व्यक्तिमत्व ओळखण्याचा हा एक दृष्टिकोन आहे. नाहीतर कुणालाही वाटले असते, आता तिथे जाऊन कशाला राहायचे, आधी गावात जन्म झाला, तिथे वीज नाही, रस्ते नाहीत, चला इथेच राहूया. या माणसाला तर इतक्या यातना सोसाव्या लागल्या, इतके अपमान झेलावे लागले आणि त्यानंतरही तो म्हणतो की, ठिक आहे येथे मला मान मिळाला, सन्मान मिळाला, अस्पृश्यतेचा ठावठिकाणा देखील नाही, तिथे जे काही असेल, मात्र जाईन तिथेच. एखादी आंतरिक शक्ती आतमध्ये असते, तेव्हा असे होते.

दुसरे वैशिष्टय पहा, समाजाप्रति आक्रोश, संताप, दु:ख, यातना होणे, हे सर्व होऊन देखील त्यांची भारत-भक्ती क्षणोक्षणी दिसून येते, मात्र मला भारत-भक्ती एका देशाच्या रुपात, सीमांमध्ये अडकलेल्या देशाच्या रुपात नाही, त्याच्या सांस्कृतिक वारशाचा त्यांना अभिमान वाटत होता. ज्याच्या विकृतींनी इतकी मोठी संकटे उत्पन्न केली होती, खूप कठीण असते, अशा अवस्थेत देखील सत्यापर्यंत पोहोचणे आणि म्हणूनच त्यांनी पीएचडी केली, तेव्हा त्यांचा एक विषय होता प्राचीन भारतीय व्यापार आता प्राचीन भारतीय व्यापाराकडे त्यांचे मन आकर्षित होणे, यावरुन हे सिध्द होते की भारताची प्रतिष्ठा आणि भारताचे गुणगान यांच्याशी त्यांचे अतूट नाते होते. नाहीतर दुसराच पैलू समोर आला असता. मला तर असे वाटते की आज जे धोरणकर्ते आहेत, जे धोरण आखतात, त्यांनी आर्थिक जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांचा काय पगडा आहे, काय विचार होते, त्याचा काही ताळमेळ आहे की अजूनही जगाला बाबासाहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे, यावर विशेष शोध निबंध व्हायला हवा, भारतासारख्या देशात त्यांचा आर्थिक विचारांचा मंत्र अगदी सोपा होता, “बहुजन हिताय, बहुजन सुखाय !”
हे “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे मूळ तत्व आहे. मला वाटते आर्थिक दृष्टया कोणत्याही सरकारला या परीघाच्या बाहेर जाण्याचे कोणतेच कारण नाही, कोणतेच कारण नाही.

आज आपण रिझर्व बँकेची कल्पना करतो. देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग, राज्यांची मागणी असते, इतके पैसे कोण देईल, इतके पैसे कोण देईल. कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते, वित्त आयोगाचा, आणि संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, मग ती आरबीाआय असो, अशा अनेक संस्था आहेत.

आज आपण नदीजोड अभियान राबवतो, रिव्हर ग्रिड बाबत बोलतो, आज भारतात एक महत्त्वपूर्ण समस्या आहे, आता दोन दिवसांपूर्वी मी सरन्यायाधीशांबरोबर भोजनाला बसलो होतो, ते देखील विचारत होते की हे रिव्हर ग्रिड काय चालले आहे ? बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात पाण्यासंदर्भात आयोग स्थापण्याची कल्पना मांडली होती. म्हणजेच एखादी दूरदृष्टी असलेली व्यक्ती कशाप्रकारे पुढचा विचार करत असेल.

त्यांनी विकासामध्ये स्त्रीचे महत्त्व, तिचे योगदान अधोरेखित केले. जेव्हा पुरुषांसाठी मानाचे‍ि दिवस नव्हते, त्या काळी दलित, पीडित शोषित समाजाला अपमानास्पद वागणूक मिळायची, अशा परिस्थितीत देखील या महापुरुषाच्या मनात हा विचार येतो, विकासयात्रेत खांद्याला-खांदा लावून समान भागीदारीची त्यांनी कल्पना केली होती. आणि यासाठी ते म्हणायचे “शिक्षण आणि बघा, बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक बाबतीत शिक्षणाला सर्वोत्तम प्राधान्य दिले. बाकी सर्व नंतर, आधी शिका, कठीण परिस्थितीत देखील शिका. शिकलात तर ही एक गोष्ट आहे, जी जग तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

शिकण्याचा हा त्यांचा जो आग्रह होता, शिकवण्याचा जो आग्रह होता, यामुळेच समाजाला एक नवीन ताकद मिळाली आहे. आणि आज आपण एका बाजूला 125 वी जयंती आणि दुसरीकडे त्यांचे हे विचार घेऊन चालत आहोत.
बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या मूळ जीवनाशी असलेल्या नात्याबाबत मी बोलत होतो. अखेरच्या दिवसांत त्यांची प्रकृती खूपच खालावली होती, म्हणजेच त्यांचे शरीर एक प्रकाराचे आजारांचे घर बनले होते. लहानपणी किंवा तरुणपणी जेव्हा शरीर बळकट बनवण्याची वेळ असते तेव्हा त्यांना संधी मिळाली नाही कारण पोटभर जेवण मिळत नव्हते.

आणि जेव्हा आयुष्यात संधी मिळाली, तेव्हा त्यांनी स्वत:ला समाज आणि देशाच्या सेवेत झोकून दिले. आणि जे काम हाती घ्यायचे, ते मनापासून करायचे, म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे कामात बुडून जायचे आणि म्हणूनच अशी वेळ आली की शरीराने साथ देणे सोडून दिले.

इतक्या साध्या सरळ जीवनात यशस्वी झाल्यानंतर कुणालाही वाटले असते कि, चला बाबा, आता शरीर साथ देत नाही, ईश्वराच्या चरणी शरण जाऊ, सगळे सोडून दया. जे होईल ते होईल.

त्यांनी हार मानली नाही. त्यांचे शेवटचे पुस्तक त्यांनी मृत्यूपूर्वी चार दिवस अगोदर पूर्ण केले. चार दिवसांनंतर त्यांचे निधन झाले. शेवटचे पुस्तकही पहा चिंतनाचे “भारतीय प्राचीन व्यापार”, या पहिल्या शोध निबंधाने त्यांना जगात ओळख मिळवून दिली तर शेवटचे पुस्तक होते “बुध्द आणि कालमार्क्स”

आता बघा, त्यावेळी कालमार्क्स चर्चेत होता. समाजवादी चिंतन तसेच भारतात देखील जवळजवळ त्यांचे नाव चर्चेत होते. त्यावेळी महापुरुष भगवान बुध्द यांच्या विचारांना मूळ आधार बनवून “बुध्द आणि कालमार्क्स” नाही लिहिले. “बुध्द आणि कालमार्क्स” लिहिले आहे आणि सर्वसमावेशक, “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” असा त्यांचा अट्टाहास राहिला आहे.

जर आर्थिक विचारांबाबत बोलायचे आहे तर ते भारताच्या मातीशी निगडित आहे. ज्यात बुध्द देखील एक खूप मोठा प्रमुख प्रवाह होता, ज्यात बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान होते. आणि म्हणूनच मला वाटते की अशा अमूल्य गोष्टी कोणताही देश आपल्या पूर्वजांबाबत, आपल्या इतिहासाशी नेहमी समरसून जातो, तेव्हाच या पल्लवित होतात. आपला इतिहास विसरण्याचा प्रयत्न, आपल्याला कधीही ताकद देत नाही.

बाबासाहेब आंबेडकर मनस्वी होते, एक शक्ती. होते. ज्यांनी आज आपल्याला इतका मोठा सामाजिक दृष्टिकोन दिला, आर्थिक दृष्टिकोन दिला, वैधानिक दृष्टिकोन दिला आणि एक प्रकारे समाज आणि राष्ट्रसंचालनाचे जे मूलभूत कायदे आहेत, त्या मूलभूत कायद्यांच्या पायाभरणीत त्यांनी आपली ताकद पणाला लावली.

आज अशा महापुरुषाचे स्मरण करण्याची संधी मिळाली आहे आणि ही अभिमानाची बाब आहे की भारत सरकार आज हे नाणे आणि मला माहित आहे, बहुधा, भारत सरकारचे हे पहिले नाणे असेल ज्याला उभे राहून टाळयांचा कडकडाट मिळाला असेल.

नाणी तर खूप निघाली असतील आणि समाजातील प्रत्येक दलित, पीडित, शोषित, वंचित ज्याच्याकडे सव्वाशे रुपयांची ताकद नसेल, मात्र त्याच्यासाठी हे नाणे पुण्यप्रसार मणी बनेल, तुम्ही बघा. असे याचे स्वरुप असेल आणि म्हणूनच हे अर्पण करताना एक जबाबदारी पार पाडल्याचे समाधान होत आहे.

भावी पिढयांना दिशा देण्यासाठी या सर्व गोष्टी उपयोगी पडाव्यात हाच एक शुभ आशिर्वाद आहे. मी पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो कि वेळेवर सर्व गोष्टी होत आहेत. यासाठी मी अर्थमंत्रालयाचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.

खूप-खूप धन्यवाद !

S.Kane/S.Tupe/M.Desai