Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डोडा येथील दुर्घटनेत लष्कराचे जवान मृत्युमुखी पडल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 22 जानेवारी 2026

डोडा येथील दुर्घटनेत लष्कराचे शूर जवान मृत्युमुखी पडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, डोडा येथील दुर्घटनेमुळे आपण अतिशय व्यथित झालो आहे. या दुर्घटनेमध्‍ये आपण आपले शूर लष्करी जवान गमावले आहेत. देशासाठी त्यांनी केलेली सेवा सदैव स्मरणात राहील, असे ते म्हणाले.

जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आणि पीडितांना सर्वतोपरी मदत पुरवली  जात असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी समाज माध्‍यम ‘एक्स’वर लिहिले;

“डोडा येथील दुर्घटनेमुळे खूप दुःख झाले आहे, या दुर्घटनेमध्ये आपण आपले शूर लष्करी जवान गमावले आहेत. त्यांनी  राष्ट्रासाठी केलेली सेवा सदैव स्मरणात राहील. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो. पीडितांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे.”

* * *

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai