पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाका येथील हल्ल्यातील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘ढाका येथील हल्ल्यामुळे आम्हाला झालेले दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बोललो आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.
या दुःखद समयी भारत बांग्लादेशच्या बंधू आणि भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या हल्ल्यात जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती लवकर सुधारो अशी मी प्रार्थना करतो.
S.Kane/B.Gokhale
The attack in Dhaka has pained us beyond words. I spoke to PM Sheikh Hasina & strongly condemned the despicable attack.
— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2016
India stands firmly with our sisters & brothers of Bangladesh in this hour of grief.
— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2016
My thoughts are with the bereaved families. I pray that those who are injured recover quickly.
— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2016