Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तीन कॉरिडॉरचा समावेश असलेल्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, तीन कॉरिडॉरचा समावेश असलेल्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-II साठी, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने ठेवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे मार्गांची एकूण लांबी 118.9 किमी असेल, आणि या मार्गावर 128 स्थानके असतील.

या प्रकल्पासाठी रु. 63,246 कोटी खर्च अपेक्षित असून, तो 2027 सालापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. टप्पा-II पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर, चेन्नई शहरात एकूण 173 किमी लांबीचे मेट्रोचे जाळे असेल. टप्पा- II प्रकल्पात पुढील तीन कॉरिडॉरचा समावेश आहे:

  • कॉरिडॉर-(i): माधवरम ते SIPCOT, 50 स्थानाकांसह 45.8 किमी लांबीचा मार्ग.
  • कॉरिडॉर-(ii): लाइटहाऊस ते पूनमल्ले बायपास, 30 स्थानाकांसह 26.1 किमी लांबीचा मार्ग.
  • कॉरिडॉर-(iii): माधवरम ते शोलिंगनाल्लूर, 48 स्थानाकांसह 47 किमी लांबीचा मार्ग.

टप्पा-II पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर, चेन्नई शहरात एकूण 173 किमी लांबीचे मेट्रो रेल्वे नेटवर्क असेल.

फायदे आणि विकास:

चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-II, हा शहराच्या पायाभूत सुविधांमधील विकासाची ठळक प्रगती दर्शवतो. टप्पा-II, शहरातील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार करेल.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai