Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 30 जून 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

“तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात आग लागल्याने झालेल्या जीवितहानीमुळे मला अतिव दु:ख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत  लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.

प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

 

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai