Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञांशी पंतप्रधानांनी चर्चा केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञांशी चर्चा केली. सुमारे दोन तास चाललेल्या या चर्चेच्या वेळी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, पियुष गोयल, धर्मेन्द्र प्रधान हे केंद्रीय मंत्री, निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडीया तसेच केंद्र सरकार आणि निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील नैसर्गिक वायूचा वाटा वाढवणे, भारतातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन क्षेत्रात नवी गुंतवणूक, नियामक आराखडा, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि नैसर्गिक वायू साठे प्राप्त करणे, पातळ थरांच्या दगडातून निर्मित होणारा वायू आणि कोळश्याच्या स्तरातून निर्माण होणारा मिथेन वायू यासारखी नवी वायू उपलब्धता क्षेत्रे तसेच “मेक इन इंडिया” अंतर्गत तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राशी संबंधित शक्यता आदी विषयांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली.

या क्षेत्रामध्ये पाहण्याच्या आपल्या नव्या दृष्टीवर तसेच गुंतवणूक वाढीला चालना देणे, तंत्रज्ञानाचे अत्याधुनिकीकरण, आणि मनुष्यबळ विकास या मुद्दयांवर पंतप्रधानांनी भर दिला.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai