Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दक्षिण सुदानमधून परतलेल्या भारतीयांचे पंतप्रधानांकडून स्वागत


दक्षिण सुदानमधून परतलेल्या भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी यादवीग्रस्त दक्षिण सुदानमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. ‘ऑपरेशन संकट मोचन’ द्वारे भारतीयांना परत आणण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, भारतीय हवाईदल, भारतीय रेल्वे, एअर इंडिया यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दलही पंतप्रधानांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

S. Bedekar / B. Gokhale