Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुबईच्या शासकांना त्यांच्या मुलाच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांत्वनपर पत्र


पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी दुबईचे पंतप्रधान आणि संयुक्त अरब अमिरातचे (युएई) उपाध्यक्ष, दुबईचे शासक , महामहिम शेख मोहम्मद बिन राशीद अल-मख्तुम यांना त्यांचा मुलगा महामहिम शेख रशीद बिन मोहम्मद अल- मख्तुम यांच्या निधनाबद्ल सांत्वनपर पत्र लिहिले आहे.

“तुमचा मुलगा महामहिम शेख रशीद बिन मोहम्मद अल- मख्तुम यांच्या अकस्मात आणि अकाली निधन झाल्याचे कळताच मला अतिशय दुःख झाले आहे.

‘‘त्यांच्या निधनामुळे सार्वजनिक आयुष्यातील एक होतकरू कारकिर्द दुर्दैवी रीतीने संपुष्टात आली आहे. या वैयक्तिक दु:खाच्या क्षणी, आमचे विचार आणि प्रार्थना आपल्या कुटुंबीयांसोबत आणि युएईच्या नागरिकांसोबत सदैव आहेत. या कधीही न भरुन निघणाऱ्‍या हानीमध्ये भारतीय लोक हे संयुक्त अरब अमिरातीच्या बंधुभगिनींच्या दु:खात सहभागी आहेत”, असे पंतप्रधानांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिले आहे.

D. Wankhede/M. Desai