Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुहेरी कर आकरणी टाळण्यासाठी आणि आयकर संदर्भातील वित्तीय चोरी रोखण्यासाठी भारत व कुवैत दरम्यानच्या सामंजस्य करारामधील सुधारणांच्या मसुद्याला मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दुहेरी करआकारणी टाळण्यासाठी आणि आयकर संदर्भातील वित्तीय चोरी रोखण्यासाठी भारत व कुवैत दरम्यानच्या सामंजस्य करारामधील सुधारणांच्या मसुद्याला मंजूरी दिली आहे.

या मसुद्यांमध्ये करासंदर्भातल्या प्रकरणांवर माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त मानकांची तरतूद आहे. या मसुद्यांमध्ये भारतीय नागरिकांसंदर्भातली कुवैतकडून प्राप्त झालेली माहिती कुवेतच्या सक्षम प्राधिकरणाने अधिकृत परवानगी दिल्यानंतर ही माहिती अन्य विधी संस्थांना देऊ शकतो.

भारत आणि कुवैत ने वर्ष 2006 मध्ये दुहेरी करआकारणी टाळण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

S.Tupe/N.Sapre