Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी भारत व ईस्राईल यांच्यामध्ये झालेल्या प्रोटोकॉल आणि करारात दुरुस्ती करणाऱ्या प्रोटोकॉलला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी व उत्पन्नावरील करातील चोरी थोपविण्यासाठी भारत व इस्राईल दरम्यान झालेल्या प्रोटोकॉल आणि करारात दुरुस्ती करणाऱ्या प्रोटोकॉलला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या प्रोटोकॉलमध्ये करसंबंधी माहितीच्या योग्य पद्धतीने देवाण-घेवाणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृती प्राप्त मानकांचा उल्लेख आहे; ज्यामध्ये बँक माहिती तसेच गैरस्थानिक कर हिताची माहिती देखील समाविष्ट आहे. यामध्ये याचाही उल्लेख आहे की एखाद्या भारतीय रहिवाशासंबंधी इस्राईल जी माहिती मिळेल, त्याला इस्राईल सक्षम प्राधिकरणाची स्वीकृती मिळाल्यानंतर इतर कायदा प्रवर्तन संस्थांना दिली जाऊ शकते. अशाचप्रकारे इस्राईल एखाद्या रहिवाशासंबंधी भारताकडून जी माहिती मिळेल, त्याला भारताच्या सक्षम प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर इतर कायदा प्रवर्तन संस्थांना ती माहिती देता येऊ शकेल.

या प्रोटोकॉलमध्ये कराराचा दुरुपयोग रोखण्यासाठी दुरुपयोग रोधक तरतूद म्हणून “लाभाच्या मर्यादा” या कलमाचा उल्लेख करण्यात आला आहे. कराराचा दुरुपयोग झाल्यास या कलमातील तरतुदींनुसार करभरणा टाळणे किंवा करचुकवेगिरीच्या प्रकारात संबंधित उपाय आणि देशांतर्गत कायद्याचा उपयोग केला जाईल.

S.Kulkarni/S.Tupe