पीएम्इंडिया
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीद्वारे प्राप्त उत्पन्नावर दुहेरी कर टाळण्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यातील एका करारावर स्वाक्षऱ्या करायला, केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात आली. या करारानुसार आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक परिचालनाद्वारे प्राप्त नफ्यावर केवळ एकाच देशात कर लागू करण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित उद्योग ज्या देशातील असेल, त्या देशाला तो कर देय राहिल. या करारामुळे भारत आणि मालदीव या देशातील हवाई उद्योगांना, कर निश्चितीचा दिलासा मिळणार आहे.
M.Pange/S.Tupe/M.Desai