पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी लोकांना पुरेसे पाणी पिण्याचे, बाहेर पडताना पाणी सोबत ठेवण्याचे तसेच या कडक उन्हाळ्यात इतरांना पाणी देऊन मदत करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी लोकांना चक्कर येणे, मळमळणे आणि तीव्र थकवा अशा अति उष्णतेमुळे होणाऱ्या थकव्याच्या लक्षणांबद्दल सतर्क राहण्याचा सल्लाही दिला. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ओआरएस उपलब्ध करून देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
Different parts of India are witnessing soaring temperatures and the challenges that come with it. This heat is harsh on all of us and I urge you all to take as many precautions as possible. Please stay hydrated, keep water with you when stepping out. Offer a glass of water to…
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
नागरिकांनी उष्णतेच्या लाटेदरम्यान वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करावी तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्याची, दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
या कडक उन्हाळ्याच्या काळात करुणा बाळगून नागरिकांनी पक्षी आणि प्राण्यांसाठी घराबाहेर, बाल्कनी, गच्ची, दुकाने आणि कार्यालयांमध्ये पाण्याची भांडी ठेवावीत असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशाच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“भारताच्या विविध भागांमध्ये प्रचंड उष्णता जाणवत आहे आणि त्यामुळे अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. ही उष्णता आपल्या सर्वांसाठी त्रासदायक आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांनी शक्य तितकी खबरदारी घेण्याचे आवाहन करतो. कृपया पुरेसे पाणी प्या, बाहेर पडताना पाणी सोबत ठेवा. इतरांनाही एक ग्लास पाणी द्या. अशा हवामानात, दयाळूपूर्ण छोट्या मदतीचे देखील मोठे महत्त्व आहे.”
चक्कर येणे, मळमळणे किंवा तीव्र थकवा जाणवणे यासारख्या उष्णतेमुळे होणाऱ्या थकव्याच्या लक्षणांकडे लक्ष द्या. तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीला असामान्यपणे अस्वस्थ, अशक्त वाटत असल्यास किंवा डोकेदुखी सुरू झाल्यास, त्यांना ताबडतोब थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवणे उत्तम. त्यांना पाणी, ओआरएस (ORS) इत्यादी मिळेल याची खात्री करा, यामुळे त्यांना आराम मिळेल. तीव्र उष्णतेच्या काळात विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक असुरक्षित असतात. या धोक्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे उष्माघात (हीटस्ट्रोक) देखील होऊ शकतो. अशा हवामानात, वेळेवर घेतलेली काळजी आणि लक्ष खूप महत्त्वाचे असते.
या उष्णतेच्या लाटेत, जेव्हा शक्य असेल तेव्हा वृद्ध आई-वडील, आजी-आजोबा आणि प्रियजनांना फोन करून त्यांची विचारपूस करा. त्यांना पुरेसे पाणी पिण्याची, दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याची आणि शक्य असेल तेव्हा विश्रांती घेण्याची आठवण करून द्या.
या तीव्र उष्णतेत, आपण आपल्या परिसरातील पक्षी आणि प्राण्यांचीही आठवण ठेवूया. तुमच्या घराबाहेर, बाल्कनी, गच्ची, दुकाने किंवा कार्यालयाबाहेर ठेवलेले पाण्याचे एक लहान भांडे तहानलेल्या पक्ष्यासाठी जीवनदायी ठरू शकते. या कठीण दिवसांमध्ये करुणाच आपले मार्गदर्शन करो.”
“देश के अलग-अलग हिस्सों में तापमान लगातार बढ़ रहा है और इसके साथ ही दैनिक जीवन में गर्मी से होने वाली कई कठिनाइयां भी बढ़ रही हैं। मैं सभी देशवासियों से आग्रह करता हूं कि जितनी अधिक सावधानी बरत सकें, अवश्य बरतें। कृपया स्वयं को हाइड्रेटेड रखें, घर से बाहर निकलते समय पानी साथ रखें। ऐसे मौसम में आपकी संवेदनशीलता भी बहुत बड़ा सहारा बन जाती है। यदि संभव हो, तो किसी प्यासे व्यक्ति को एक गिलास पानी अवश्य दें। मैं ऐसे लोगों की सराहना भी करूँगा जो अपने घरों के और दुकानों के बाहर मटके में जल रखते हैं ताकि कोई भी उनसे पानी पी सके।”
“अत्यधिक गर्मी से होने वाली परेशानी, जैसे चक्कर आना, मतली या ज्यादा थकान लगे तो उसे बिल्कुल भी नजरअंदाज न करें। यदि आपके आसपास किसी व्यक्ति को अचानक बेहोशी जैसा लगे, कमजोरी महसूस करे या फिर अस्वस्थ दिखाई दे, तो उसे तुरंत किसी ठंडी और छायादार जगह पर ले जाएं। उसे पानी, ORS या अन्य तरल पदार्थ दें, जिससे शरीर को राहत मिल सके। बच्चे, बुज़ुर्ग और धूप में काम करने वाले लोग इस भीषण गर्मी में सबसे अधिक प्रभावित होते हैं। समय रहते ध्यान न देने पर यह स्थिति हीटस्ट्रोक जैसी गंभीर समस्या का रूप ले सकती है। ऐसे समय में आपकी सतर्कता और देखभाल किसी का जीवन बचा सकती है।”
“जब भी संभव हो, अपने माता-पिता, दादा-दादी, नाना-नानी और अन्य प्रियजनों को फोन कर उनका हालचाल अवश्य पूछें। उन्हें पर्याप्त पानी पीने, दोपहर की तेज धूप में बाहर न निकलने और जितना हो सके, आराम करने की सलाह दें।”
“इस प्रचंड गर्मी में हमें अपने आसपास के पशु-पक्षियों को भी नहीं भूलना चाहिए। अपने घर, बालकनी, छत, दुकान या ऑफिस के बाहर पानी से भरा एक छोटा-सा बर्तन रखना भी किसी प्यासे पक्षी के लिए जीवनदान बन सकता है। आइए, इन कठिन दिनों में पूरी संवेदनशीलता और करुणा के साथ एक-दूसरे का ध्यान रखें।”
देश के अलग-अलग हिस्सों में तापमान लगातार बढ़ रहा है और इसके साथ ही दैनिक जीवन में गर्मी से होने वाली कई कठिनाइयां भी बढ़ रही हैं। मैं सभी देशवासियों से आग्रह करता हूं कि जितनी अधिक सावधानी बरत सकें, अवश्य बरतें। कृपया स्वयं को हाइड्रेटेड रखें, घर से बाहर निकलते समय पानी साथ रखें।…
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Different parts of India are witnessing soaring temperatures and the challenges that come with it. This heat is harsh on all of us and I urge you all to take as many precautions as possible. Please stay hydrated, keep water with you when stepping out. Offer a glass of water to…
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
Whenever possible, call and check on elderly parents, grandparents and loved ones during this heatwave. Remind them to stay hydrated, avoid stepping out in peak afternoon hours and take rest whenever possible.
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
In this extreme heat, let us also remember the birds and animals around us. A small bowl of water kept outside your home, balconies, terraces, shops or offices can become a lifeline for a thirsty bird. May compassion guide us in these difficult days.
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
देश के अलग-अलग हिस्सों में तापमान लगातार बढ़ रहा है और इसके साथ ही दैनिक जीवन में गर्मी से होने वाली कई कठिनाइयां भी बढ़ रही हैं। मैं सभी देशवासियों से आग्रह करता हूं कि जितनी अधिक सावधानी बरत सकें, अवश्य बरतें। कृपया स्वयं को हाइड्रेटेड रखें, घर से बाहर निकलते समय पानी साथ रखें।…
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
जब भी संभव हो, अपने माता-पिता, दादा-दादी, नाना-नानी और अन्य प्रियजनों को फोन कर उनका हालचाल अवश्य पूछें। उन्हें पर्याप्त पानी पीने, दोपहर की तेज धूप में बाहर न निकलने और जितना हो सके, आराम करने की सलाह दें।
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026
इस प्रचंड गर्मी में हमें अपने आसपास के पशु-पक्षियों को भी नहीं भूलना चाहिए। अपने घर, बालकनी, छत, दुकान या ऑफिस के बाहर पानी से भरा एक छोटा-सा बर्तन रखना भी किसी प्यासे पक्षी के लिए जीवनदान बन सकता है। आइए, इन कठिन दिनों में पूरी संवेदनशीलता और करुणा के साथ एक-दूसरे का ध्यान रखें।
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2026