पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील ग्रामविकास कार्यक्रमांची परिणामकारकता सुधारण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय ,अन्न आणि कृषी संघटना यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
या करारामुळे ग्रामीण जनतेच्या उपजीविकेत वाढ होईल, तसेच रोजगार वर्गीकरण, कौशल्य विकास,सामाजिक सुरक्षेत वाढ होईल.
या करारामुळे ज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी दौरे आणि चर्चा करता येतील.
(B.Gokhale/S.Kane)