पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात पाम तेलाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढवण्याच्या उपाययोजनांना मंजुरी दिली. या उपाययोजना पुढीलप्रमाणे :
१. राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियानाअंतर्गत पाम तेल लागवडीसाठीच्या जमिनीची मर्यादा शिथिल
२. राष्ट्रीय तेलबिया आणि पाम तेल अभियानाच्या मिनी मिशन -2 अंतर्गत मदतीच्या निकषांचा फेरआढावा
यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणावर पाम तेलाची शेती करतील आणि खासगी उद्योजक, सहकारी संस्था, संयुक्त उपक्रम पाम तेल शेतीत गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवतील. शेतकऱ्यांनाही पाम तेलाची शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
सध्या पाम तेल विकास कार्यक्रम वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतात राबवण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर शेती करण्यासाठी खासगी उद्योजक/सहकारी संस्था/संयुक्त उपक्रम यांना थेट सहाय्य्य पुरवणे शक्य नाही. अनुत्पादक जमीन भाडेतत्वावर खासगी उद्योजकांना देता येईल. मात्र 25 हेक्टर क्षेत्रासाठीच अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
APS/S.Tupe/S.Kane/Anagha