Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात,भारत-स्पेन सहकार्याबाबत, भारत आणि स्पेन यांच्यातल्या सामंजस्य कराराची मंत्रिमंडळाला माहिती


नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात,भारत-स्पेन सहकार्याबाबत, भारत आणि स्पेन यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली. 30मे 2017 रोजी स्पेन इथे या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.उभय देशात तज्ज्ञांच्या सल्ल्याचे आदान-प्रदान सुलभ होणार असल्याने द्विपक्षीय सहकार्य दृढ व्हायला यामुळे मदत होणार आहे.

नवीकरणीय आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात,तंत्रविषयक द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने,दोघांनाही लाभदायक ठरणाऱ्या सहकार्यात्मक संस्थात्मक संबंधांसाठी पाया घालणे हा यामागचा हेतू आहे.

सहकार्याची क्षेत्रे, त्यासंबंधीचा आढावा आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त कार्यकारी समितीची स्थापनाही या सामंजस्य कराराद्वारे करण्यात येणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha