Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवीकरणीय ऊर्जा सहकार्याबाबत सर्वसाधारण रचना करार


भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील नवीकरणीय ऊर्जा सहकार्याबाबतच्या सर्वसाधारण रचना कराराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. यावर्षी 11 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या युवराजांच्या भेटीदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या रचनेवर आधारित मोठे प्रकल्प, गुंतवणूक आणि व्यावसायिक प्रयत्न, संशोधन आणि विकासात सहभाग, अक्षय आणि स्वच्छ ऊर्जा संदर्भात विकास व ज्ञानाची देवाण-घेवाण आणि त्यामुळे होणारे परस्पर लाभ साध्य करणे हा या कराराचा उद्देश आहे. या करारान्वये भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांमध्ये नवीन तसेच अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात भागिदारी शक्य होणार आहे. गुंतवणुकीसाठी संभाव्य अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या संधींचा शोध आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहयोग कायम राखणे, अक्षय ऊर्जा क्षेत्रात संशोधन आणि विकासात नव्या संधीचा शोध अशा अनेक पैलूंवर या करारान्वये लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.