Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवीकरणीय ऊर्जेसाठी 2360 कोटी रुपयांचे रोखे उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील


नवीकरणीय ऊर्जेसाठी 2360 कोटी रुपयांचे रोखे उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

2017-2018 या काळात नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, इंडियन रिनीवेबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत हे रोखे उभारणार आहे. सौर पार्कबाबतच्या योजना आणि कार्यक्रमांना मान्यता, हरित ऊर्जा कॉरिडॉर, पवन प्रकल्पाना प्रोत्साहन, छतावरचे सौर ऊर्जा प्रकल्प यासह इतर संबंधित कामांसाठी या रोख्यातून उभारण्यात आलेल्या निधीचा वापर केला जाणार आहे.

या गुंतवणुकीमुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना चालना मिळण्याबरोबरच या क्षेत्रातले महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठीही मदत होणार आहे. या रोख्यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात आणखी क्षमता विकसित होणार असून, त्याद्वारे अतिरिक्त रोजगार निर्मिती होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane