Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीतल्या एम्स येथे हरित रुग्णालय उभारण्याबाबतच्या प्रात्यक्षिक प्रकल्पासंदर्भात जपान आणि विविध मंत्रालयातील सामंजस्य कराराला मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जपानच्या नवीन ऊर्जा आणि औद्योगिक विकास संघटना आणि अर्थ, आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या दरम्यान दिल्लीतल्या एम्स येथे हरित रुग्णालय उभारण्याबाबतच्या प्रात्यक्षिक प्रकल्पासंदर्भात सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली.

अभियांत्रिकी आणि आरेखनाबाबतची पाहणी, उपकरणांचा वापर, उपकरणाचे रेखाटनासाठी मूलभूत नियोजन, उपकरणाची निर्मिती आणि वाहतूक, उपकरणाच्या कार्यप्रणालीला प्रारंभ, उपकरणांचे प्रात्यक्षिक देणे आणि भारतात या नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आदींचा या प्रकल्पात समावेश आहे.

करारावर स्वाक्षऱ्या झालेल्या दिवसापासून सामंजस्य करार अंमलात येईल आणि 31 मार्च 2020 पर्यंत परिणामकारक राहिल. दिल्लीतल्या एम्समध्ये ऊर्जा कार्यक्षम आणि माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत उपकरणे बसवून भारतातल्या पर्यावरणाचे संरक्षण आणि ऊर्जेचा कार्यक्षमतेने वापर हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha