पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान मलेशियाचे पंतप्रधान महामहिम दातो सेरी अन्वर बिन इब्राहिम यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान इब्राहिम यांचे भारतात हार्दिक स्वागत केले आणि भागीदार देश म्हणून ब्रिक्स शिखर परिषदेतील मलेशियाच्या सहभागाचे कौतुक केले. नेत्यांनी फेब्रुवारी 2026 मधील पंतप्रधान मोदींच्या मलेशिया भेटीच्या फलितांचा आढावा घेतला आणि व्यापार व गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा, सेमीकंडक्टर्स, पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्था, ऊर्जा, फिनटेक, शिक्षण, पर्यटन आणि नागरिक ते नागरिक संपर्क यांसारख्या विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीवर चर्चा केली. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी कोटा किनाबालू, सबाह येथे भारताचे महावाणिज्य दूतावास सुरू करण्यास मलेशियाची संमती दर्शवली.
आसियान-भारत संबंध दृढ करण्यामध्ये मलेशियाने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली. नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचार-विनिमय केला. त्यांनी भारत-मलेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक पुढे नेण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली.
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai