Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

निवासी जागांमध्ये निष्कासन प्रक्रिया राबवता यावी यासाठी सार्वजनिक परिसर(अनधिकृतपणे राहणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी) कायदा, १९७१ मध्ये सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने , कलम २ मध्ये निवासी जागेची व्याख्या समाविष्ट करून आणि कलम ३ मध्ये निवासी जागेतून निष्कासित करण्याच्या तरतुदींचा समावेश करून सार्वजनिक परिसर(अनधिकृतपणे राहणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी) कायदा, १९७१ मधील कलम २ आणि ३ मध्ये सुधारणा करायला मंजुरी दिली.

या सुधारणेमुळे इस्टेट अधिकाऱ्याला निवासी जागेत अनधिकृतपणे राहणाऱ्यांना निष्कासित करता येईल.

N.Sapre/S.Kane/P.Kor