पीएम्इंडिया
नेपाळचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री कमल थापा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नेपाळचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्विकारल्याबद्दल पंतप्रधानांनी थापा यांचे अभिनंदन केले. तसेच नेपाळच्या नव्या सरकारला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी थापा यांनी नेपाळच्या विकासाबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. नेपाळ एकसंध, एकात्मिक, स्थिर आणि प्रगतीशील असावा, अशी भारताची इच्छा असून नेपाळच्या जनतेबरोबर मैत्रीपूर्ण नाते दृढ करण्यासाठी भारत कटिबध्द आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.
S.Tupe/M. Desai
Met Mr.Kamal Thapa& reiterated India's desire to see a united, inclusive, stable & prosperous Nepal. http://t.co/dxOpChiiYD
— NarendraModi(@narendramodi) October 19, 2015