पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये आयोजित जी-4 शिखर संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. जी-4 गटात भारताबरोबरच ब्राझील, जर्मनी आणि जपानचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या सुधारणांवर या परिषदेचा प्रामुख्याने रोख राहील.
त्यानंतर कॅलिफोर्नियातल्या सॅन होसेला पंतप्रधान भेट देतील. टेस्ला मोटर्सला पंतप्रधान भेट देणार असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ते भेट घेतील. ॲपल इंकचे टीम कुक, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, गुगलचे सुंदर चिपाई, ॲडोबचे शंतनू नारायण यांच्याबरोबर पंतप्रधान चर्चा करतील.
डिजिटल इंडिया आणि डिजिटल तंत्रज्ञान रात्रभोजनाच्यावेळी पंतप्रधान आपले विचार व्यक्त करणार आहेत.
N. Chitale/S.Tupe