पीएम्इंडिया
माननीय अध्यक्ष दिल्मा रोसैफ
माननीय चॅन्सेलर अँजेला मर्केल
माननीय पंतप्रधान शिंझो ॲबे
विशेष प्रतिनिधी सदस्य,
तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. शनिवारी सकाळी लवकर या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल आभार. न्यूयॉर्कमध्ये नुकतेच आगमन झालेल्या पंतप्रधान ॲबे यांचे आभार.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा हा विषय गेली अनेक दशके संपूर्ण जगाचे लक्ष वेधून राहिला आहे. मात्र दुर्दैवाने यात आतापर्यंत फारशी प्रगती झालेली नाही.
जागतिक शांतता आणि प्रगती यासाठी प्रतिबध्द असलेला, बहुपार्श्वतेवर विश्वास असलेला आणि जगाच्या आपल्याकडून असलेल्या जागतिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असलेला आपला चार देशांचा जी-4 समूह 2004 मध्ये एकत्र आला.
सरकारांचे प्रमुख म्हणून 10 वर्षानंतर आपण पुन्हा भेटत आहोत, त्याचा मला आनंद आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या 70 व्या वर्धापनदिनी लिहिलेल्या माझ्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, संयुक्त राष्ट्रांची ज्या काळी स्थापना झाली त्यापेक्षा मूलत: वेगळ्या जगामध्ये आपण जगत आहोत. सदस्यांची संख्या चौपट झाली आहे. शांतता आणि सुरक्षिततेला असणारा धोका अधिक जटिल झाला आहे. अनेक पध्दतीनं आपल्या जीवनात जागतिकीकरणानं प्रवेश केला आहे.
डिजिटल युगात आपण राहतो. विकासाची नवी इंजिनं, मोठ्या प्रमाणात पसरलेली आर्थिक शक्ती, संपत्तीची वाढती दरी यामुळे जागतिक अर्थव्यवस्था बदलली आहे.
लोकसंख्या, शहरीकरण, स्थलांतरांच्या कलामुळेही नवी आव्हानं उभी ठाकत आहेत. हवामान बदल आणि दहशतवाद हे नवे चिंतेचे विषय आहेत. सायबर आणि अंतराळ या दोन नव्या आघाड्यांवर संधी आणि आव्हानंही आहेत.
तरीही आपल्या संस्था, आपला दृष्टीकोन आणि अनेकदा मनोभूमिकेतही आपल्या गत शतकाची झलक प्रतिबिंबित होते. आपण सध्या ज्या शतकात आहोत त्याची झलक दिसत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बाबतीत हे विशेषत: खरे आहे.
सुरक्षा परिषदेत निश्चित कालमर्यादेत सुधारणा करणे हे निकडीचे आणि महत्त्वाचे काम आहे. सुरक्षा परिषदेत जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा जागतिक अर्थव्यवस्थेच्या मोठ्या इंजिनाचा, महत्वाच्या सर्व खंडाच्या आवाजाचा समावेश झालाच पाहिजे. त्यामुळे 21 व्या शतकाच्या आव्हानांचा मुकाबला करताना अधिक विश्वासार्हता, अधिक सनदशीरपणा आणि प्रभावीपणा प्राप्त होईल.
दशकानंतर आपण अखेर थोडी हालचाल पाहिली. मजकुरावर आधारित वाटाघाटी सुरू करण्यासंदर्भात आम सभेच्या 69 व्या सत्रात महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं. सॅम कुरेसा आणि राजदूत कोर्टनी रॅट्रे यांच्या बहुआयामी नेतृत्वामुळे हे शक्य झाले.
मात्र हे केवळ पहिले पाऊल आहे. 70 व्या सत्रात ही प्रक्रिया तर्कशुद्ध पूर्णत्वाला जावी हे आपलं उद्दिष्ट हवे. या दिशेनं आपल्या प्रयत्नांना, आजची बैठक चालना देईल असा मला विश्वास आहे.
N. Chitale/S.Tupe
Joining ranks...the G4 leaders meet at a summit hosted by India in New York. @AbeShinzo @dilmabr pic.twitter.com/LwRk5yQMJh
— PMO India (@PMOIndia) September 26, 2015
Reforms in United Nations Security Council has been the focus of global attention for decades – unfortunately, without progress so far: PM
— PMO India (@PMOIndia) September 26, 2015
I am delighted that we are meeting again as Heads of Government after ten years: PM @narendramodi at the G4 Summit in New York
— PMO India (@PMOIndia) September 26, 2015
We live in a fundamentally different world from the time the UN was born: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 26, 2015