Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015

न्यूयॉर्क शहरात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रम – 24 सप्टेंबर 2015


अमेरिकेतील वित्तीय क्षेत्राशी पंतप्रधानांची गोलमेज बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील वित्तीय क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत गोलमेज बैठक घेतली.

या बैठकीला जे.पी. मॉर्गन कंपनीचे सीईओ जेमी डिमन, ब्लॅकस्टोन कंपनीचे अध्यक्ष, सीईओ आणि सहसंस्थापक स्टीव्ह शेवार्झमॅन, वॉरबर्ग पिंकस कंपनीचे सह सीईओ चार्ल्स काये, के.के. आर कंपनीचे सहअध्यक्ष आणि सहसीईओ हेन्री क्राव्हिस, जनरल अंटलाटिक कंपनीचे सीईओ बिल फोर्ड, एआयजी इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष पीटर हेन्कॉक, टायगर ग्लोबल कंपनीचे सहसंस्थापक चेस कोलमन, एनवाय स्टेट कॉमन रिटायरमेंट फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी विकी फुलर उपस्थित होते.

या बैठकीत बहुतांश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतात उद्योग सुरु करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरु केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पायाभूत विकासाला चालना देणे आणि डिजिटल इंडिया यासाठी पंतप्रधानांनी सुरु केलेल्या उपक्रमांचीही सकारात्मक दखल कंपन्यांनी घेतली. भारतातील नव्या उद्योग क्षेत्राविषयी अनेक कंपन्यांनी रस दाखवला तसेच उद्यमशीलता क्षेत्र आणि नव्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शवली. भारतातील करपध्दती आणि प्रशासनातील लाल फितीच्या कारभाराचे अडथळे याविषयी कंपनी प्रमुखांनी चिंता व्यक्त केली. भारतात गुंतवणूक करण्यासाठी या अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत पंतप्रधानांनी “स्टार्ट-अप इंडिया, स्टँड अप इंडिया” या अभियानामागची भूमिका स्पष्ट करत भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन कंपन्यांना केले. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांसोबतच व्यक्तीगत उपक्रम आणि उद्यमशीलता म्हणजेच “व्यक्तीगत क्षेत्र” उद्योगांना त्यांनी प्राधान्य देत या क्षेत्रात गुंतवणूक करावी असे मत मांडले.

भारतात असलेल्या संधीचा कंपनी प्रमुखांनी उल्लेख केलाच पण त्याशिवाय त्यांच्याविषयी विश्वासही व्यक्त केला याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. या प्रमुखांनी त्यांचे प्रश्न आणि चिंताही स्वच्छपणे पंतप्रधानांसोबत मांडल्याचे मोदी यांनी सांगितले. गेल्या पंधरा महिन्यात आर्थिक क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीचा यावेळी पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. या काळात भारतात थेट परदेशी गुंतवणूकीची मर्यादा मोठया प्रमाणात वाढली आहे. जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताने थेट परदेशी गुंतवणूकीसाठी दारे खुली केली आहेत, आणि यातूनच भारताविषयी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे सिध्द होते असे पंतप्रधान म्हणाले.

माध्यमे, तंत्रज्ञान आणि दूरसंवाद क्षेत्रातील प्रमुखांशी गोलमेज बैठक –भारताची यशोगाथा

अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोलमेज बैठक घेतली.

या बैठकीला न्यूज कॉर्प आणि 21st सेंच्युरी फॉकस कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष रुपर्ट मरढोक, याच कंपनीचे सीईओ जेम्स मरढोक, न्यूज कॉर्प कंपनीचे सीईओ रॉबर्ट थॉम्सन, स्टार इंडिया कंपनीचे सीईओ उदय शंकर, डिस्कव्हरी कम्युनिकेशन्‍सचे सीईओ डेव्हिड झास्लाव, सोनी एंटरटेनमेन्टचे सीईओ मायकल लिन्टन, एंटर पब्लिक ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ मायकल रॉथ, व्हाईस मिडिया कंपनीचे सीईओ शेन स्मिथ, डब्ल्यूपीपी कंपनीचे सीईओ मार्टिन सॉरेल, टाईम वॉनरचे सीईओ जेफ बिव्हकेस, ए अँड ई नेटवर्कच्या सीईओ नॅन्सी डयूबक, व्हीसी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ॲन्टनी प्राट, रुट वन इन्व्हेस्टमेंट कंपनीचे विल्यम दुहामेल आणि व्हॅल्यू ॲक्ट कॅपिटल कंपनीचे सीईओ जेफ उबेन उपस्थित होते.

या बैठकीला अमेरिकेतल्या बहुतांश कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधानांच्या ऊर्जात्मक आणि धडाडीच्या नेतृत्वाचे या प्रमुखांनी यावेळी कौतुक केले आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याविषयी सकारात्मक भावना व्यक्त केल्या. भारतात होत असलेल्या डिजिटल क्रांतीविषयी या प्रमुखांनी विशेषत्वाने उत्साह दाखवला. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या सुरु असलेले महत्त्वपूर्ण बदल आणि वाढ यामुळे या क्षेत्रात विकासाला मोठी चालना मिळाली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दूरचित्रवाणी क्षेत्रात डिजिटायझेशन आणि मोबाईल क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक भक्कम होण्याची गरज असल्याचे मत या प्रमुखांनी यावेळी व्यक्त केले. प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या होत असलेले बदल यामुळे ज्ञानाचा प्रसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत होत आहे, एका अर्थाने हे ज्ञानाचे लोकशाहीकरणच आहे असे निरिक्षण यावेळी पंतप्रधान आणि कंपन्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केले. सध्याचे युग हे तंत्रज्ञान युग आहे त्यामुळे भौतिक पायाभूत विकासाइतकेच डिजिटल पायाभूत विकासाचे महत्त्व आहे असे पंतप्रधान म्हणाले. भारत हे प्रसारमाध्यम आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक संधी आणि एक आव्हानही आहे, असे सांगत भारतात गुंतवणूक करतांना प्रादेशिक भाषांमधील प्रसारमाध्यमेही लक्षात घ्यावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली. येत्या काळात 600,000 गावे ब्रॉड-बॅण्ड सेवेने जोडण्याची सरकारची योजना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. एकविसाव्या शतकातील भारतीय नागरिकांची कल्पना करा, त्याची मूल्ये, त्याच्या समोरील आव्हाने या सर्वांचा विचार करावा असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला. मनुष्यबळ विकासात डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरु शकेल असेही पंतप्रधानांनी सूचित केले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि भारताचा विकास करण्यासाठीदेखील डिजिटल टेक्नॉलॉजीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

द्विपक्षीय बैठका

या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधानांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली आधीच्या बैठकीनंतर दोन्ही देशातील संबंधांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. भू-सीमा कराराच्या अंमलबजावणीतील प्रगतीबाबत दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी समाधान व्यक्त केले. त्याशिवाय उभय देशातील दळणवळण आणि पायाभूत सुविधा, शाश्वत विकासाचे लक्ष्य, संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेतील सुधारणा आणि इतर जागतिक प्रशासकीय संस्थांबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

सेंट विन्सेंट आणि ग्रेनाडाईन्सचे पंतप्रधान डॉक्टर राल्फ गोन्साल्वीस यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या मसुद्यावर भारताला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी गोन्साल्वीस यांचे आभार मानले.

पंतप्रधानांनी गुआनाचे राष्ट्राध्यक्ष डेव्हिड ग्रेंजर यांचीही भेट घेतली. गुआना येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने केलेल्या मदतीबद्दल राष्ट्राध्यक्ष डेव्हिड ग्रेंजर यांनी भारताचे कौतुक केले.

मायकेल ब्लूमबर्ग यांच्याशी बैठक

मायकेल ब्लूमबर्ग यांच्यासोबतही पंतप्रधानांची बैठक झाली. स्मार्ट सिटी उपक्रमात त्यांनी देऊ केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा

अमेरिकेतील उत्पादन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या 42 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी चर्चा केली. आर्थिक विकासाबाबत पंतप्रधानांनी घेतलेला दृष्टीकोन आणि गेल्या 15 महिन्यातील प्रगती याविषयी या कार्यकारी प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. भारतीय सरकार हे पारदर्शी, जबाबदार आणि निश्चित धोरणासाठी कटिबध्द आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारतातील मेक इन इंडिया, स्कील इंडिया आणि स्मार्ट सिटी उपक्रमाला यावेळी प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.

R.Aghor/S.Tupe