Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या परिवर्तनकारी प्रभावावर प्रकाश टाकणारा लेख सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणावर आणि स्वच्छ स्वयंपाक ऊर्जेच्या उपलब्धतेवर झालेल्या परिवर्तनकारी परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, या लेखामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित केला आहे. त्यानुसार महिलांकडे केवळ धोरणांच्या लाभार्थी म्हणून न पाहता, त्या धोरणांची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.

पंतप्रधानांनी X वर लिहिले:

“केंद्रीय मंत्री @dpradhanbjp लिहितात की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना  महिलांना केवळ धोरणांच्या लाभार्थी म्हणून नव्हे, तर त्याच्या सुरुवातीच्या केंद्रबिंदू म्हणून पाहिले जाते  हा एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते.

या कार्यक्रमामुळे एलपीजीचा विस्तार झाला आणि लक्षित अनुदान हस्तांतरणाद्वारे 10 कोटींपेक्षा अधिक महिलांपर्यंत पोहोचता आले. स्वच्छ स्वयंपाक पद्धतीकडे झालेल्या बदलामुळे घरगुती वायू प्रदूषण कमी झाले असून आरोग्य आणि जीवनमान सुधारले आहे. आता लक्ष सातत्यपूर्ण वापर, परवडणारी किंमत आणि ऊर्जा न्याय सुनिश्चित करण्यावर आहे.

हा माहितीपूर्ण लेख अवश्य वाचा!”

***

हर्षल अकुडे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai