Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा आज लखनौ दौरा; उद्या योग दिन कार्यक्रमात सहभागी होणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौच्या दौऱ्यावर जात आहेत, मोदी तिथे उद्याच्या योग दिन कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

पंतप्रधान आज संध्याकाळी सी एस आय आर अर्थात केंद्रीय औषध संशोधन संस्थेला भेट देणार आहेत.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम तांत्रिक विद्यापीठाच्या इमारतीचे देखील पंतप्रधान उद्‌घाटन करणार आहेत. पंतप्रधान, लखनौ-कानपूर दरम्यान 400 के व्ही विद्युत पारेषण लाईनचे लोकार्पण करणार आहेत.

मोदी, पंतप्रधान आवास योनजेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरित करणार आहेत.

तिसऱ्या योग दिनानिमित्त लखनौमध्ये रमाबाई आंबेडकर मैदानात आयोजित योग दिन कार्यक्रमात पंतप्रधान उद्या सकाळी सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांचे लखनौमधील सर्व कार्यक्रम तुम्ही तुमच्या मोबाईलवर http://nm4.in/anldapp वर थेट पाहू शकता.

B.Gokhale/S.Mhatre/D. Rane