Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा आसाम, ओडीशा दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ते 7 फेब्रुवारी 2016 दरम्यान आसाम, आंध्रपद्रेश आणि ओडीशा या तीन राज्यांचा दौरा करणार आहेत.

पंतप्रधान 5 फेब्रुवारी रोजी दिबूगड, आसाम येथे पोहचतील. ते लेपेटकाटा येथे ब्रम्हपुत्रा क्रॅकर आणि पॉलिमर मर्यादित कंपनीचे उद्‌घाटन करणार आहेत. ईशान्येकडील हा पहिलाच पेट्रो-रसायन प्रकल्प आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या नुमालीगड रिफायनरी मर्यादित उद्योगाला राष्ट्राला अर्पण करणार आहेत. भारतात सर्वाधिक वॅक्स निर्मिती करणारा उद्योग आहे.

दिबूगड नजीक मोरण येथे पंतप्रधान चहा कामगारांना संबोधित करणार आहेत. सिबसागर येथे श्रीमंत शंकरदेव संघ यांच्या 85व्या वार्षिक परिषदेला देखील मोदी संबोधित करणार आहेत.

गुवाहाटीमध्ये होणाऱ्या 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार आहेत. या क्रीडा स्पर्धेत अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे आठ देश सहभागी होणार आहेत.

6 फेबुवारी रोजी पंतप्रधान विशाखापट्टणम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते एका सागरी प्रदर्शनाला देखील भेट देणार आहेत.

7 फेब्रुवारीला पंतप्रधान भुवनेश्वर येथे पोहचतील जिथे ते राष्ट्रीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे लोकार्पण करतील. मोदी पुरी येथील श्री. जगन्नाथ मंदिरात देखील जातील.

पंतप्रधान पारदिप येथील तेल शुध्दीकरण कारखाना राष्ट्राला समर्पित करणार आहेत. या पारदीप शुध्दीकरण एकूण क्षमता 15 एमएमटीपीए इतकी आहे. या कारखान्यात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन इंडेन मॅक्सिमायझेशन किंवा इंडमॅक्स युनिट लावण्यात आले आहे जे उच्च दर्जाच्या एलपीजीचे उत्पादन करते. ही रिफायनरी हायड्रोकार्बन क्षेत्र औद्योगिकरणाची एक नवीन लाट निर्माण करेल तसेच पूर्व भारत क्षेत्राच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त करुन देईल अशी आशा आहे. पंतप्रधान रिफायनरीमधल्या इंडमॅक्स युनिटला आणि मुख्य नियंत्रण कक्षाला भेट देतील.

7 फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान विशाखापट्टणमला येतील, जिथे ते आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय शहर संचलन तसेच प्रात्यक्षिकांचे निरिक्षण करतील. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai