Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा

पंतप्रधानांचा झारखंड दौरा


झारखंडमधल्‍या खुंटी येथे जिल्हा न्यायालयासाठी 180 केवी क्षमता असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यासाठी गांधी जयंती हा उत्तम दिवस असल्‍याचे पंतप्रधानांनी यावेळी आयोजित एका विशाल सभेत सांगितले. सभेत आदिवासी स्त्रिया मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. गांधीजींनी नेहमीच आपल्या विचार आणि कृतींमधून निसर्गाशी सलोखा राखत जगण्याचा मार्ग दाखवला, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

अलिकडेच केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या दौऱ्याबाबतची माहितीही पंतप्रधानांनी दिली, तिथे आलेल्या जगभरातल्या नेत्यांनी जागतिक तापमान वाढ आणि त्याचा मानवजातीवर होणारा परिणाम याबाबत जगभरातल्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली. या समस्येसाठी भारत जबाबदार नाही. निसर्गाचे नुकसान करु नका हीच शिकवण आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र या संकटापासून मानवजातीला वाचवण्यासाठी भारत आपले पूर्ण सहकार्य देईल, असे त्यांनी सांगितले. सौर ऊर्जेचा प्रयोग हे याच दिशेने उचलेले एक पाऊल आहे. कोळशाच्या साठयाने समृध्द असलेल्या झारखंडमधले एक जिल्हा न्यायालय सौर ऊर्जेवर चालणे, हे महत्त्वपूर्ण असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

न्यायालयांमध्ये वीज नसल्यामुळे न्यायदानाच्या कामात अडथळा आल्याची अनेक उदाहरणे आहेत. न्यायालय परिसरात सौर ऊर्जा उपलब्ध झाल्यामुळे या प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे, असे ते म्हणाले. ऊर्जासंवर्धनासाठी आणि वीजबिल कमी यावे, यासाठी एलईडी दिव्यांचा व्यापार करण्याचे आवाहन त्‍यांनी केले.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली. 1965 च्या भारत पाकिस्तान युध्दात मिळवलेल्या विजयाचा सुवर्णजयंती महोत्सव देशाने नुकताच साजरा केला. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना भारताने हे युध्द जिंकले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अलिकडेच केलेल्या ताश्कंद दौऱ्याचा, ताश्कंद येथे केलेल्या शास्त्री यांच्या पुतळयाच्या अनावरण कार्यक्रमाचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी दुमका येथे प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आयोजित भव्य कर्ज शिबिराचे उद्‌घाटनही केले आणि 5 लाभार्थ्यांना मुद्रा कार्ड आणि कर्जासंबंधीचे दस्तऐवज प्रदान केले. खुंटी आणि दुमका दोन्ही ठिकाणी नागरिक मोठया संख्येने उपस्थित असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. झारखंडची जनता विकासासाठी किती उत्सुक आहे, हे यावरुन कळून येते, असे ते म्हणाले. जागतिक बँकेच्या अलिकडच्या अहवालात झारखंडची सुलभपणे काम करणारे राज्य अशी नोंद झाली. या उल्लेखनीय प्रगतीबद्दल पंतप्रधानांनी राज्य सरकारचे आणि जनतेचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत 42 लाख नागरिकांना 26 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले. यामुळे लघू उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास आणि सावरकरांच्या कचाटयातून मुक्ती मिळवण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांमध्ये 20 लाख महिला असल्याचे त्यांनी सांगितले.

“सबसिडी त्याग” अभियानाअंतर्गत आतापर्यंत 31 लाख लोकांनी एलपीजी सबसिडी सोडली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. यामुळे जे गरजू आहेत त्‍यांना याचा लाभ देणे शक्य होत आहे. दारिद्रयरेषेखालील 3 कुटुंबांना एलपीजीची नवी जोडणी पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आली.

दुमका जिल्हयातल्या ऐतिहासिक मलूती मंदिर परिसराचे संवर्धन आणि विकास याबाबतच्या प्रकल्पाचे ऑनलाईन उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले.

झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री रघुवर दास खुंटी आणि दुमका इथल्या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित होते. दुमका येथील कार्यक्रमात पेट्रोलियम राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान आणि अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा उपस्थित होते.

S. Kulkarni/S.Tupe