पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरकारी सचिवांसमवेत सुमारे 70 मिनिटे चर्चा केली.
गेल्या दीड वर्षात सचिवांनी केलेल्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. प्रशासनाच्या वेगवेगळया क्षेत्रात काम करणा-या सचिवांच्या दांडग्या अनुभवाची नवनव्या क्षेत्रातल्या कार्याशी सांगड घालायला हवी असे पंतप्रधान म्हणाले.
सुप्रशासन, रोजगार निर्मिती, शिक्षण आणि आरोग्य, शेतकरी केंद्रीत अभियान, वेगवान सर्व समावेशक विकास, स्वच्छ भारत, गंगा पुनरुज्जीवन, ऊर्जा स्वयंपूर्णता या क्षेत्रातल्या कायापालटासाठी सचिवांनी कल्पकतेसह पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रत्येक क्षेत्रात जनतेच्या जीवनात कायापालट घडवून आणणा-या उपाययोजनांवर प्रामुख्याने लक्ष हवे यावर पंतप्रधानानी जोर दिला. प्रशासनात जनतेचा सहभाग तसेच सामान्य माणसाच्या सबलीकरणावर त्यांनी विशेष जोर दिला.
येते दोन आठवडे हे सचिव उपगटाद्वारे आपसात चर्चा करतील त्यानंतर त्यांच्या सूचना आणि कल्पना पंतप्रधानासमोर सादर करतील.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, नीतीन गडकरी यावेळी उपस्थित होते. मंत्रिमंडळ सचिवालयाचे तसेच पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
N.Chitale/S.Tupe/M.Desai
Interacted with the Secretaries to the Government of India. https://t.co/bxiaOHPvc5
— Narendra Modi (@narendramodi) December 31, 2015