Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम, क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम,   क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम,   क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम,   क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम,   क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम,   क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम,   क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

पंतप्रधानांचे क्वालांलपूरमधील महत्त्वूपर्ण कार्यक्रम,   क्वालालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती


पूर्व आशिया परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज क्वलालंपूरमधील पूर्व आशिया परिषदेला उपस्थित राहिले. यावेळी पंतप्रधानांनी दहशवादाच्या जागतिक आव्हानांवर भाष्य केले.

पॅरिस, अंकारा, बैरुत, माली आणि रशियन विमानावरील क्रूर दहशतवादी हल्ले आपल्याला सतत ही जाणीव करुन देत आहेत की दहशतवादाची सावली ही आपल्या समाजाच्या सीमा ओलांडून सर्व जगावर आपले सावट पसरवित आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपल्याला नवीन जागतिक संकल्प आणि नवीन धोरणांची आखणी करायला हवी. कोणत्याही देशाने दहशतवादाचा वापर करु नये तसेच त्याला पाठिंबाही देऊ नये. दहशतवादी गटांमध्ये कोणताही फरक नाही, कोणालाही अभय नाही, कोणालाही निधी नाही, कोणालाही शस्त्रास्त्रे पुरवली जाणार नाहीत, परंतु आपणही आपल्या समाजामध्ये आपल्या युवकांसोबत काम करायला हवे. दहशतवादाला कोणत्याही धर्मासोबत न जोडण्याच्या वचनबध्दतेचे आणि मनुष्याच्या प्रत्येक मूल्याला प्रोत्साहीत करण्याचे प्रयत्नांचे मी स्वागत करतो असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारत आणि बांगलादेशने नुकतेच यूएनसीएलओएसच्या उपाययोजनांचा वापर करत आपल्या सागरी सीमांबाबतचा मुद्दा तडीस नेला. भारताला आशा आहे की, दक्षिण चीन सागरात संघर्ष असलेले सर्व देश दक्षिण चीन सागरासंदर्भातल्या घोषणा पत्राचा अवलंब करुन त्याच्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करतील. हे सर्व देश संमतीपत्राच्या आधारे आचार संहिताचा अवलंब करण्यासाठी जोमाने प्रयत्न करतील अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

स्वामी विवेकानंदांच्या पुतळयाचे अनावरण

पंतप्रधानांनी रामकृष्ण मिशन येथे स्‍वामी विवेकानंदांच्या पुतळयाचे अनावरण केले. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे फक्त एक व्यक्ती नव्हते तर ते भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आत्मा आहेत. जर आपण उपग्रहावरुन भारतीय संस्कृतीच्या व्याप्तीचे दर्शन घेतले तर विवेकानंद आपल्याला आपल्यातच दिसतील. जेव्हा संपूर्ण विश्व ऐहिक सुख आणि आध्यात्मामध्ये दुभागले जात होते तेव्हा स्वामी विवेकानंदांनी पाश्चिमात्य देशांना भारतीय अध्यात्माचा संदेश दिला. ते पुढे म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून ते ज्या आसियान परिषदेत सहभागी होत आहेत त्या परिषदेचा विषयच आहे. “एक आशिया” ही संकल्पना सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनी मांडली होती.

भारतीय समाजाला संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियन-भारतीय समुदायाला संबोधित केले. भारत हा त्याच्या सीमेपुरता मर्यादित नाही. भारत हा जगातील कोणत्याही भागात राहणाऱ्या भारतीयाच्या मनात आहे.

स्वतंत्र भारत हा मलाया-भारतीयांच्या कृतज्ञतेबद्दल ऋणी आहे. भारतीय संघर्षाची गाथा ही मलेशियातील मलाया भारतीयांचे बलिदान आणि संघर्षाने देखील लिहिली गेली आहे. नेताजी सुषाषचंद्र बोस आणि भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी तुमचे हजारो पूर्वज पुढे आले होते. अनेक महिला आपले घरातील आरामदायी आयुष्य बाजूला सारुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झाल्या होत्या असे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वतंत्र भारताच्या उदयासाठी ज्या मलाया-भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना पंतप्रधानांनी यावेळी श्रघ्दांजली अर्पित केली.

70 वर्षापूर्वी वेदनादायी आणि भयानक अशा जागतिक युध्दाची समाप्ती झाली. मी त्या सर्व भारतीय जवानांना श्रध्दांजली अर्पित करतो ज्यांना या युध्दादरम्यान मलेशियाच्या युध्दभूमीमध्ये वीरमरण प्राप्त झाले. शहीद झालेल्या जवानांपैकी बहुतांश शीख होते. त्यांचे रक्त कायमस्वरुपी हया मलेशियाच्या भूमीशी एकरुप झाले आहे हे असे युध्द होते ज्याचा परिणाम आपल्या दोन्ही देशांवर झाला असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जगासमोर सध्या दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. याला कोणतीही सीमा नाही. दहशतवाद आपला उद्देश साध्य करण्यासाठी धर्माच्या नावाखाली लोकांचा वापर करुन घेत आहे. परंतु हे चुकीचे आहे, यामुळे लोकांच्या विश्वासाचा मृत्यू होत आहे. आपल्याला दहशतवादाला धर्मापासून वेगळे करायला हवे. मानवतेला मानणारे आणि मानवतेच्या विरुध्द वागणूक असणारे फक्त एवढाच फरक असू शकतो. मी हे आधीही सांगितले होते आणि आताही सांगतोय सध्याच्या या सर्वात मोठया आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असे पंतप्रधानांनी सांगितले.

मलेशियामध्ये वर्ष 1954 मध्ये मलेशियन-भारतीय मुलांना शिक्षणासाठी सहाय्य उपलबध करुन देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्यार्थी ट्रस्ट निधीची स्थापना करण्यात आली. मलेशियातील भारतीय समाजाला आजही या निधीची आवश्यकता आहे. या ट्रस्टसाठी एक दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या निधीची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे असे मोदींनी सांगितले.

मलेशियातील हजारो मुले भारतात डॉक्टर होण्यासाठी जातात. डॉक्टर ही आपल्या समाजाची महत्वपूर्ण गरज आहे. मला आशा आहे की, तुम्ही इतर क्षेत्रातल्या शिक्षणाच्या संधींचा देखील फायदा घ्याल. आपल्या दोन्ही देशांकडून मिळालेल्या पदवींना मलेशिया आणि भारताने त्वरीत मान्यता द्यावी. या मुद्दयावर मी पंतप्रधान नजीब यांच्यासोबत तातडीने चर्चा करणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

S.Mhatre/S.Tupe/N.Sapre