Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे ब्रिटनमधील कार्यक्रम – नोव्हेंबर 13, 2015

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दोन्ही देशांदरम्यान असणाऱ्‍या ऐतिहासिक संबंध आणि हितसंबंधाविषयी सांगितले. आर्थिक संबंध हे दोन देशांमधील भागीदारीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे घटक आहेत, असे ते म्हणाले. “मेक इन इंडिया”, पायाभूत संरचनेच्या विकासासाठी विशेष भर, अनेक क्षेत्रामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला असणारा वाव, तसेच 2022 पर्यंत सर्वांना 50 दशलक्ष नवीन घरे व 175 गिगा वॅट एवढ्या नवीकरणीय ऊर्जचे उत्पादन या केंद्र सरकारच्या उपक्रमांचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. भारतात ब्रिटिश कंपन्यांनी केलेली गुंतवणूक ही दोन्ही देशांना फायदेशीर ठरणारी भागीदारी राहील.

महाराणींनी (इंग्लडच्या राणींनी) पंतप्रधान मोदी यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांनी भेटवस्तूही दिल्या.

भारताची अफाट अशी विविधता हेच त्याचे वैशिष्ट्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लंडनमध्ये वेंबले स्टेडियम येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ब्रिटिश-भारतीय समुदायाला ब्रिटनचे पंतप्रधान श्री. डेव्हिड कॅमेरॉन यांच्या उपस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी शिख समुदायाच्या महान योगदानाविषयी आणि भारताच्या सुफी परंपरेविषयी सांगितले. लंडनमध्ये शिख समुदायासोबत काल झालेल्या बैठकीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी शिख समुदायाच्या वेदना व समस्या आपणास कळतात व त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आपण काम करत असल्याचे सांगितले.

भारताविषयीच्या त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट करतांना पंतप्रधानांनी एका तासापेक्षा अधिक चालेल्या आपल्या भाषणात अल्वर, राजस्थान येथील इम्रान खान यांचा उल्लेख केला. खान यांनी 50 शैक्षणिक अ‍ॅप्स तयार करून ते मोफत वितरित केले होते. जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेले “सेल्फी विथ डॉटर” या हरियाणाच्या एका सरपंचाच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानाने “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपणास भारताच्या एका उज्वल भविष्याची खात्री असल्याचे सांगितले. कारण, भारतामधील इम्रान खान,ज्याने शैक्षणिक अ‍ॅप्स तयार करून विनामूल्य वाटले व ते सरपंच ज्यांनी “सेल्फी विथ डॉटर” ची संकल्पना मांडली, हे खऱ्‍या अर्थाने त्यांच्या मते भारताची दृष्टी आहेत.

जगातील सर्व प्रमुख धर्म भारतात आहेत आणि खूप मोठ्या संख्येने आहेत. भारतीय समुदाय जेथे पण जातात तेथे हि मुल्ये घेऊन जातात. त्यामुळे तेच खऱ्‍या अर्थाने भारताचे महान राजदूत आहेत, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

पंतप्रधानांनी आतापर्यंत सरकारने घेतलेल्या पुढाकाराविषयी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ भारत, स्वच्छ ऊर्जा, भारतीय नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणाऱ्‍या योजना यांचा समावेश होता. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्‍या सौर ऊर्जेच्या उत्पादनाचे ध्येय गाठण्यासाठी जगामधील मुबलक प्रमाणात सौर उर्जा लाभलेल्या देशांच्या “सौर युतीचे” जागतिक नेतृत्व भारत करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

D.Wankhede/B.Gokhale