Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुजरात न्याय विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ

पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुजरात न्याय विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ

पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुजरात न्याय विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात न्याय विद्यान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली. या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी पूर्वापार अपारंपरिक मानली जाणारी शाखा निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. सध्याच्या काळात या शाखेचे अनन्यसाधारण महत्व आहे. हा आत्मविश्वास आणि निष्ठा या विद्यार्थ्यांना पुढच्या काळात उपयुक्त ठरेल असे पंतप्रधान म्हणाले. न्याय विज्ञानाच्या भक्कम यंत्रणेमुळे नागरी सुरक्षेची खातरजमा करण्याबरोबरच गुन्हांना आळा बसतो.

गुन्हा करताना गुन्हेगाराला आपण पकडले जाऊ ही भीती असणे महत्वाचे आहे. अशाचवेळी न्याय विज्ञान महत्वाचे ठरते असे पंतप्रधान म्हणाले.

गुन्ह्यांचा तपास आणि न्याय प्रदान करण्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मानव संसाधन पूल निर्मितीबद्दल त्यांनी जीएफएसयुची प्रशंसा केली. गुजरात न्याय विज्ञान विद्यापीठ, प्रशिक्षण आणि शिक्षणाद्वारे जागतिक सुरक्षेत निर्णाय भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांच्या आव्हानाविषयी बोलताना त्यांनी न्याय आणि गुन्हे न्याय प्रयोगशाळा मजबूत करण्याचे महत्त्व विषद केले. विमा उद्योगातल्या न्याय विज्ञानाच्या महत्वाचाही त्यांनी उल्लेख केला.

गुन्हेगारांना न्यायाच्या चौकटीत आणण्यासाठी न्याय यंत्रणेला मदत करण्यासाठी फोरॅन्सिक तज्ञांनी डीएनए प्रोफायलिंगचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केला. महिलांसंदर्भातल्या गुन्ह्यांसह इतर घृणास्पद कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले जग अधिक उत्तम व्हावे यासाठी प्रगतीशील बदलाकरीता विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. पदवीधर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

N.Sapre/N.Chitale/P.Kor