Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोमनाथ येथे वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ पथकाची थरारक प्रात्यक्षिक


नवी दिल्ली, 11 मे 2026

सोमनाथ अमृत महोत्सवाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ (Suryakiran Aerobatic Team) या चित्तथरारक हवाई कसरतींच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला.

आकाशात पाहायला मिळालेला हा अभिमान आणि शौर्याचा अभूतपूर्व संगम सोमनाथ मंदिरावर भगवा आणि तिरंग्याची आभा पसरवणारा होता, असे या प्रात्यक्षिकांविषयी पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. भक्ती आणि शक्तीचा हा संगम आणि हे विलोभनीय दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचे हृदय आनंदाने भरून आले असून सर्वांना याचा सार्थ अभिमान वाटत आहे, असेही मोदी म्हणाले.

‘एक्स’ या समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात;   

“आज सोमनाथच्या आकाशात अभिमान आणि शौर्याचा एक भव्य संगम पाहायला मिळाला. भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ पथकाने अत्यंत थरारक हवाई कसरती सादर केल्या. भक्ती आणि शक्तीच्या या प्रचितीने प्रत्येकाचे मन हर्षोल्हासाने भरून गेले आहे.

 

सुवर्णा बेडेकर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai