पीएम्इंडिया
पंतप्रधान, श्री नरेन्द्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मृती दिनानिमित्त, राष्ट्रीय पोलिस स्मारक राष्ट्राला समर्पित केले.
आपत्ती निवारण मोहिमांमध्ये सहभागी झालेल्यांना गौरविण्यासाठी पंतप्रधानांनी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर केला. आपत्ती काळात लोकांचे जीव वाचविणे आणि त्यांना प्राप्त परिस्थितीत धैर्य देणे अशा बहादुरीची कामे करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रत्येक वर्षी जाहीर केला जाईल.
नरेन्द्र मोदी यांनी राष्ट्रीय पोलिस स्मारक येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. हॉट स्प्रिंग्सच्या घटनेच्या तीन जिवंत सदस्यांना त्यांनी सन्मानित केले. त्यांनी राष्ट्रीय पोलिस स्मारक संग्रहालयाचे उद्घाटन केले आणि अभ्यागतांच्या अभिप्राय पुस्तकात स्वाक्षरी केली.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या पोलिसांच्या धैर्याला व बलिदानाला सलाम केला. त्यांनी लडाखमधल्या हॉट स्प्रिंग्स येथे धैर्याने लढा देणाऱ्या पोलिसांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबाप्रति आदर व्यक्त केला.
राष्ट्रीय पोलीस स्मारक राष्ट्राला समर्पित केल्याबद्दल आपल्याला समाधान वाटत असल्याचे सांगतांना पंतप्रधान म्हणालेत की, “केंद्रीय पोलीस स्मृतीशिल्प” हे, पोलीस दलाची कार्यक्षमता, धैर्य आणि सेवा अभिमुखता दर्शविते. राष्ट्रीय पोलीस स्मारकातील प्रत्येक वस्तू नागरिकांना प्रेरणा देत राहील आणि पोलीस आणि निम लष्करी दलाच्या शौर्याची माहिती त्यातून नागरिकांपर्यंत पोहोचेल. पोलिस आणि निम लष्करी दल तसेच सशस्त्र सेने नी आपत्ती प्रसंगात केलेल्या त्यागामुळे, निरंतर प्रयत्नांमुळे आज राष्ट्र शांतता , सुरक्षा आणि समृद्धी बघू शकत आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने केलेल्या त्यागाचा आणि योगदानाचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. पोलीस आणि निम लष्करी दल आपत्ती प्रतिसाद दलाचा महत्वपूर्ण भाग असून आपत्ती काळातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रीय पोलीस स्मारकाला रालोआ सरकारचे प्राधान्य होते आणि ते वेळेमध्ये पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांप्रति आदर प्रकट करण्याची सरकारची वृत्ती या स्मारकातून अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.
आपले दररोजचे कर्तव्य बजावताना तंत्रज्ञान आणि नाविन्यता स्वीकारण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या संदर्भात तंत्रज्ञान अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र यांच्या माध्यमातून पोलीस दल अद्ययावत करणाऱ्या पोलीस दल आधुनिकीकरण योजनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.
पोलीस आणि समाज यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यामध्ये पोलीस दलांची भूमिका महत्वाची असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पोलीस ठाणी नागरिकांसाठी अधिकाअधिक मैत्रीपूर्ण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
राष्ट्रीय पोलीस स्मारकात केंद्रीय शिल्प, कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांची नावं असलेली वीरता दर्शवणारी भिंत आणि शहीद पोलिसांच्या आठवणींना उजाळा देणारे संग्रहालय आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
Tributes to our brave police personnel. Dedicating to the nation the National Police Memorial. https://t.co/yp49snY5EN
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
Today, on #PoliceCommemorationDay, PM @narendramodi inaugurated the National Police Memorial in Delhi.
— PMO India (@PMOIndia) October 21, 2018
He paid tributes to the policemen and policewomen serving India.
He also paid homage to all those police personnel who lost their lives in the line of duty. pic.twitter.com/BKCz4CQIwu
During the programming marking #PoliceCommemorationDay and the inauguration of the National Police Memorial, PM @narendramodi also inaugurated a museum in the same complex as the memorial. pic.twitter.com/Avc8SwFdxk
— PMO India (@PMOIndia) October 21, 2018
Today, we not only dedicate the National Police Memorial to the nation but also salute our police personnel for their service.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
I am sure this Memorial will stand as a reminder of the courage and sacrifice of policemen and policewomen, who keep the nation safe. pic.twitter.com/H6mQ2zydkM
Had the opportunity to interact with surviving members of the Hot Springs incident.
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
The bravery of those associated with the incident will never be forgotten. pic.twitter.com/lG8f1XGLQh
Whenever an unfortunate disaster strikes, it is our police personnel who are working round the clock, at the forefront of rescue and relief operations. Proud of them! pic.twitter.com/Oqirw4i5FW
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018
Made a special announcement at the National Police Memorial. pic.twitter.com/ExJPBAmYET
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2018