पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2026
उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्या हस्ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘ऑलीय दर्जली दोस्तलिक’ (सर्वोच्च मैत्रीचा सन्मान) प्रदान करण्यात आला. परदेशी नेत्यांना दिला जाणारा उझबेकिस्तानचा हा सर्वोच्च सन्मान आहे.
पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार भारतातील 140 कोटी जनतेला समर्पित केला. हा पुरस्कार दोन्ही देश आणि संस्कृतींमधील चिरंतर मैत्रीचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष मिर्झियोयेव्ह यांनी केलेले कौतुक हे भारत आणि उझबेकिस्तानमधील युगानुयुगांची मैत्री आणि त्यांच्या सामायिक वारशाचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले. या सन्मानामुळे ग्लोबल साऊथचे भागीदार म्हणून मानवतेच्या कल्याणासाठी उझबेकिस्तानसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची भारताची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
‘ऑलीय दर्जली दोस्तलिक’ हा पुरस्कार प्रदान केला जाणे, हे दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक संबंधांचे आणि दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जाणाऱ्या भारत-उझबेकिस्तान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचे प्रतिबिंब आहे.
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Honoured to receive the ‘Oliy Darajali Do’stlik’ Order. I dedicate this to the enduring bond between India and Uzbekistan. https://t.co/nu1LoNGXFM
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2026