Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेला संबोधित केले

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ  परिषदेला संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उज्जैन जवळच्या निनौदा येथे आंतरराष्टीय विचार महाकुंभ परिषदेला संबोधित केले.

पंतप्रधानांनी इंदौरच्या विमानतळावर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांचे स्वागत केले. इंदौर येथून राष्ट्रपती सिरिसेना पंतप्रधानांबरोबर परिषदेच्या ठिकाणी पोहोचले.

कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर “विचार कुंभ” असे वर्णन करण्यात आलेल्या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी ही परिषद नव्या प्रयत्नांचा जन्म असल्याचे सांगितले. ते म्हणाले की प्राचीन काळी ज्याप्रमाणे समाजातील विचारवंत कुंभमेळयाच्या ठिकाणी समाजाला नवी दिशा देण्यासाठी एकत्र जमायचे त्याचीच ही आधुनिक आवृत्ती आहे.

भारतीय परंपरा आणि संस्कृती याबाबत विस्ताराने बोलतांना ते म्हणाले की, “भिक्षुक” मंत्राचा अर्थ आहे “मला भिक्षा देणाऱ्या व्यक्तीचे भले होवो आणि न देणाऱ्या व्यक्तीचे देखील भले होवो”. भारतीय संस्कृतीची व्याख्या करणाऱ्या मनुष्यस्वभाव आणि मूल्यांचे अनेक दाखले पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी सिंहस्थ घोषणापत्र जगाला समर्पित केले. याबाबत पंतप्रधान म्हणाले की, या निमित्ताने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात नवीन प्रवचनाचा आरंभ होईल.

वनीकरण आणि मुलींचे शिक्षण यासारख्या मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी दरवर्षी “विचारकुंभ” आयोजित केला जावा अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.

S.Kane/S.Tupe/M.Desai